ईडीनं अनिल अंबानी यांनाच समन्स बजावले येत्या 5 तारखेला ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना केली आहे.

मुंबई:- ईडीने काही दिवसापूर्वी अनिल अंबानी यांच्या कंपन्यावर छापेमारी केली होती. यात अनेक महत्वाचे कागदपत्र, संगणक जप्त करण्यात आले आहे. बँक कर्ज प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी त्यांच्या रिलायन्स ग्रुपच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसते. 24 जुलै रोजी ईडीने (प्रवर्तन निदेशालय) अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या विरोधात छापेमारी केली होती, दोन-तीन दिवस चौकशी सुरु होती.आता ईडीनं खुद्द अनिल अंबानी यांनाच समन्स बजावले आहे. येत्या 5 तारखेला ईडीच्या कार्यालयात त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 17 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार झाल्याचे आरोप त्यांच्यावर आहे. याबाबत ही चौकशी होणार आहे.ईडीने काही दिवसापूर्वी अनिल अंबानी यांच्या कंपन्यावर छापेमारी केली होती. यात अनेक महत्वाचे कागदपत्र, संगणक जप्त करण्यात आले आहे. बँक कर्ज प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.