गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना १० हजार रुपये लाच स्वीकारताना अटक

अहिल्यानगर :- पांचयात समिती राहुरी येथील गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी कडून अटक करण्यात आली, तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत.त्याच्यावर या आगोदर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती. निलंबन सुरू असतानाच तक्रारदार ग्रामसेवक सेवानिवृत्त झाले. त्यांच्यावरील दोषारोपपत्राचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी पाठवायचा होता. तो अहवाल तक्रारदाराच्या बाजूने पाठवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली.नगर शहरातील मुंडे यांच्या राहत्या घरीच ही कारवाई करण्यात आली.