छ.संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर एसीबीच्या जाळ्यात.

जमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये करण्यासाठी शासनास नजराणा पुन्हा भरावयाचा असल्याने त्यासाठी लागणारे चलन पुन्हा भरणा करून देण्यासाठी त्रिभुवन व विनोद खिरोळकर हे दोघे तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्याकडे लाच म्हणून १८ लाख रुपयांची मागणी करीत होते, अशी तक्रार २३ मे रोजी देण्यात आली. या तक्रारीची पडताळणी करताना दीपक त्रिभुवन याने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी १८ लाख रुपये सांगितल्याचे समोर आले. २६ मे रोजी लाच मागणी पडताळणी केली असता निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तक्रारदार, आरडीसी विनोद खिरोळकर व दीपक त्रिभुवन यांच्यात लाच रकमेबाबत बोलणे झाले व पाच लाख रुपये सुरुवातीला व संचिका (फाईल) पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत १८ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार २७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर दीपक त्रिभुवन याने बोलल्याप्रमाणे पाच लाख रुपये तक्रारदार, त्यांचे सहकारी व पंचासमोर स्वीकारले. त्याचवेळी दीपक त्रिभुवनला व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दुसऱ्या पथकाने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनाही ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *