नागपूरच्या कोंढाळी येथील लाटखोटीया शाळेतील मुख्यधापकाचा मनमानी कारभार

नागपुर मुख्याध्यापकाने पाचवीच्या वर्गाचा निकाल रोखून धरल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. नागपूरच्या कोंढाळी येथील लाटखोटीया शाळेत हा प्रकार घडला आहे.मिळालेल्या माहिती नुसार, मोहम्मद असे पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलाचे नाव आहे. चौथ्या वर्गाची फी न भरल्याने मुख्याध्यापकाने माझ्या मुलाचा शाळा सोडल्याचा दावा दिल्याचे मोहम्मगचे वडील अब्दुल खकिल शेख यांनी म्हटले आहे. आम्ही पाचवीच्या वर्गाची फी सुद्धा भरली आहे. चौथ्या वर्गाची फी बाकी आहे. त्यामुळे सहाव्या वर्गात प्रवेश न देता शाळा सोडल्याचा दाखला पालकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आल्याचा दावा अब्दुल खकिल शेख यांनी केला आहे.शाळेची फी भरण्यास विलंब केल्याने पाचव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला शाळा सोडल्याचा दाखला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला. निकाल रोखून आम्हाला त्रास दिला जात आहे असे मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे. शाळेच्या संदर्भात तक्रार केल्याने वचपा काढण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचा दावा मुलाच्या वडिलांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *