पाच जणांविरोधात पुसद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुसद स्थानिक गुन्हे शाखेने गोपानीय माहितीच्या आधारे गुरुवार, 5 जून रोजी ही प्रभावी कारवाई केली आहे.या कारवाईत राजकुमार श्रावण पारधी (सावळी ता. मानोरा जि. वाशीम), तुकाराम दामा गुहाडे (हर्षी ता. पुसद), भाऊ आनंद पतंगे (कोंदूर ता. कळमनुरी जि. हिंगोली) आणि रामदास किसन भरकाडे (डोणवाडा ता. वसमत जि. हिंगोली) यांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार पंडित भालेराव (शिवणी ता. कळमनुरी जि. हिंगोली) याला पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.या पाच जणांविरोधात पुसद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार 5 जूनच्या रात्री गस्त करत असताना माहिती मिळाली की, नवीन पुसद येथील सोनू पाटील यांच्या भाड्याच्या खोलीत राजकुमार पारधी हा राहात असून त्याच्याकडे 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यात येत आहे.