भडगाव तालुक्यातील रेशनचे धान्य काळ्या बाजारात.

भडगाव:- तालुक्यात अनेक रेशन दुकान आहेत शासनाने रेशन मालाचा काळाबाजार थांबावा म्हणून अनेक उपाययोजना केल्या आहेत. परंतु रेशनचा काळाबाजार थांबत नाही ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांना शासनाची योजना प्रामाणिकपणाने लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आटोकाट प्रयत्न करतांना दिसते. परंतु याच प्रयत्नांना कुठेतरी शासनाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांकडून गालबोट लावण्याचे काम मोठ्या प्रमाणात भडगाव शहरात सुरु आहे. म्हणून सदर काळाबाजार बंद होणार नाही अशी सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये शंका आहे.नुकताच भडगाव येथील रेशनच्या गोडाऊनमध्ये लाभार्थ्यांसाठी आलेल्या मालामध्ये कशा पद्धतीने लूट केली जाते, जिल्हास्तरावरून आलेला रेशनचा हजारो क्विंटल रेशन भरलेल्या गोण्यांमधून कशा पद्धतीने कमी करण्यात येते व ते मोठ्या प्रमाणात बाहेर विक्रीसाठी पाठविले जाते, या संदर्भात चित्रफीत तयार करण्यात आली होती व ती संबंधित पुरवठा अधिकारी व तहसीलदार भडगाव यांना देण्यात येऊन यासंदर्भातील चौकशीची मागणी दिनांक ९ एप्रिल २०२५ तसेच २५ एप्रिल २०१५रोजी निवेदन देऊन करण्यात आली होती. तसेच मा. उपविभागीय अधिकारी पाचोरा यांना देखील दिनांक २१ मे २०२५ रोजी या घोटाळ्या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *