मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

नाशिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि ‘चक्र’ चे ( सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था व अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधन, नवाचार व स्टार्ट अप सुरू करणारी केंद्रे व्हावीत. त्यादृष्टीने आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र व ‘चक्र’ हे उपयुक्त ठरेल, आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था यामधून निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राने वैद्यकीय शिक्षणात चांगली प्रगती केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे असा विचार असून गेल्या २ वर्षात शासकीय १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने गेल्या २५ वर्षात चांगले काम केले आहे.-मुख्यमंत्री
जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (दूरदृष्यप्रणाली द्वारे), शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ आदी यावेळी उपस्थित होते.