मोहाचापाडा येथे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी जयंती निमित्त महानुभाव पंथाची आढावा बैठक.

नाशिक पेठ:- आज पेठ तालुक्यातील मोहाचापाडा श्रीकृष्ण मंदिर मोहाचापाड येथे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी जयंती निमित्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी तालुक्यातील महानुभाव पंथाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. पेठ तालुका समिती सलागार समिती अध्यक्ष हरीभाऊ सातपुते समिती सचिव अंबादास खंबाईत समिती सदस्य गांगोडे समिती सदस्य रामचंद्र वाघमारे, समिती सदस्य कामडी समिती सदस्य चंदर भांगरे तसेच मोहाचापाडा गावाचे उपदेशी ग्रामस्त तालुक्यातील ऊपदेशी बंधू भगिनी आदी ऊपस्थित होते.