राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ याना पद्मश्री पुरस्कार

मराठी सिनेमा सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अशोक सराफ यांच्या आयुष्यातील हा अत्यंत भावनिक क्षण होता. तर त्यांच्या चाहत्यांसाठी हा कधीही न विसरता येणारा अभिमानास्पद क्षण होता. दिल्लीवरुन मुंबईत परतताना अशोक सराफ यांना विमानात आणखी एक सरप्राइज मिळालं. अशोक सराफ ज्या विमानात बसले होते ते विमान त्याची पायलट त्यांची सख्खी भाची होती.अशोक सराफ यांना विमानात बघताच त्यांच्या भाचीचा आनंद गगनात मावेनासा झाला. अशोक सराफ यांना विमानात बघताच त्यांची पायलट भाची अदिती परांजपे हिने खास अनाऊसमेंट केली. “मी पायलट अदिती परांजपे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. ही माझ्यासाठी खूप खास आणि भावनिक फ्लाइट आहे. माझे काका अशोक सराफ आपल्यासोबत प्रवास करत आहेत. ज्यांना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांची भाची आणि या फ्लाइटची कॅप्टन असल्याच्या नात्याने माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की टाळ्या वाजवून तुम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करावं”, अशी अनाऊंसमेंट अदितीने केली.