सरकारने दुटप्पी भूमिका घेऊ नये,समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत.शरद पवार

नाशिक येथील पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात बोलताना महत्त्वपूर्ण विधान केले.राजकीय घडामोडी तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी थेट सरकारला लक्ष्य केले.पवार यांनी, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘हैदराबाद गॅझेट’ लागू करण्याचा जीआर (GR) काढला, त्याला ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. या जीआरला आव्हान देण्यासाठी ओबीसी संघटना न्यायालयात गेल्या आहेत, ज्यामुळे परिस्थिती खुप गंभीर आहे.शरद पवार यांनी पुढे म्हणाले, आरक्षण देण्यासाठी आमचा कोणताही विरोध नाही, परंतु ते देत असताना समाजात तेढ निर्माण होणार नाही ही काळजी घेणे गरजेचे आहे.एका समाजाला खुश करण्यासाठी दुसऱ्या समाजाला नाराज करणे हे राज्याच्या भविष्यासाठी धोक्याचे आहे.सरकारने या प्रश्नावर गांभीर्याने विचार करावा, नाहीतर समाजात अस्वस्थता वाढेल आणि त्याचे वाईट परिणाम दिसून येतील,असे पवार यांनी म्हटले आहे.