सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांना एसीबी (ACB)कडून अटक

पुणे पिंपरी चिंचवड :- भोसरी येथील सहाय्यक महावितरण एसीबी कडून अटक करण्यात आली.तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार असून, त्यांचे काम महावितरणकडील लायझनिंग आणि वीज कनेक्शनच्या मंजुरीशी संबंधित आहे. त्यांनी ४ मार्च २०२५ रोजी एका ग्राहकासाठी घरगुती वीज जोडणीसाठी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाची प्रक्रिया सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांच्या टेबलावर आली होती. या अर्जावर कार्यवाही करून मंजुरी देण्यासाठी नरवडे यांनी तक्रारदाराकडे प्रथम ₹३५,००० लाच मागितली. या मागणीमुळे तक्रारदाराने २ जून २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली.सापळा रचून रंगेहाथ कारवाईतक्रारीच्या अनुषंगाने ४ जून २०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी नरवडे यांनी लाच रक्कम तडजोड करत ₹२५,००० वर आणली आणि ती रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार, ५ जून रोजी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे नरवडे यांनी तक्रारदाराकडून खाजगी इसम श्यामलाल असोकन याला लाच रक्कम स्वीकारण्यास सांगितले. श्यामलालने सदर रक्कम पंचासमक्ष स्वीकारताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *