वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे: बनावट कागदपत्र तयार करून वाघोलीतील १० एकर जमिन बळकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुणे शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चार जणांविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.