स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार किलो २० ग्रॅम गांजा हस्तगत.

सिन्नर :- नाशिक-पुणे महामार्गाने सिन्नरकडे येणाऱ्या एका गाडीमधून ८२ हजार रुपये किमतीचा चार किलो २० ग्रॅम गांजा पकडून पोलिसांनी कारसह दोघांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.प्रथमेश पोपट राऊत (२५, रा. घुलेवाडी, संगमनेर) व शिवाजी गोरख सातपुते (२७, रा. साईनगर, नेहरू चौक, संगमनेर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेली गुप्त माहिती नुसार ही कारवाई करण्यात आली. नाशिक ते पुणे महामार्गावर हॉटेल न्यु वैष्णवी समोर पथकाने सापळा रचला होता. त्याच वेळी कार (एमएच ०१ एसी ५७४९) तेथे येताच पोलिसांनी कार थांबवत प्रथमेश राऊत व शिवाजी सातपुते यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८२ हजार रुपयांचा चार किलो २० ग्रॅम वजनाचा गांजा व कार असा एकूण ८ लाख ३० हजार ४०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्याविरूध्द सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *