प्रोफेसर महिलेची १ कोटी ८२ लाख रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांन कडून टोळीचे भांडाफोड

नवी मुंबई एका प्रोफेसर महिलेची सायबर भामट्यांनी आयकर विभागाच्या कारवाईच्या नावाने १ कोटी ८२ लाख ७२ हजारांची फसवणूक केली होती. या महिलेने साडेआठ लाखांचा कर चुकवल्याने त्यांच्यावर विभागाकडून कारवाई होणार असल्याचे त्यांना फोनवरून धमकावले होते. यासाठी त्यांना ईडी, सीबीआय अशा अनेक शासकीय संस्थांचे कारवाईचे बनावट आदेश पाठवले होते. चौकशीसाठी त्यांच्या बँक खात्यातली सर्व रक्कम संबंधितांनी गुन्ह्यात वापरलेल्या खात्यात वर्ग करून घेतली होती. फेब्रुवारीमध्ये याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे, सहायक निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, सचिन कोकरे, मंगेश वाट. नितीन जगताप. अनिल यादव आदींचे पथक केले होते. या तपासानंतर आणखी काही प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.