नागालँड मधील अजित पवार गटाला खिंडार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार एनडीपीपी मध्ये प्रवेश

नागालँड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदारांनी एनडीपीपीमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पत्रक काढून कारवाईचे संकेत दिले आहेत. सध्या पक्षाकडून पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत कशा प्रकारे या आमदारांवर कारवाई करता येईल याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत स्थानिक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेल्या जनादेशाचा हा अपमान असून लवकरच आम्ही त्यांची बाजू समजून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कायदेशीर पातळीवर आणि राजकीय पातळीवर आम्ही याप्रकरणी लढाई लढणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे. (Ajit Pawa