पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश.

जालना जिल्हा आंदोलकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कंबरेत ‘फिल्मी स्टाईल’ लाथ घालणे पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांना भोवण्याची शक्यता आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि जालना जिल्हा पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे.शिवाय कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.