पेठ तालुक्यात भगवान बिरसामुंडा १५० वी जयंती साजरी.तसेच रानभाजी महोत्सव साजरा.

पेठ तालुक्यातील इनामबारी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे भगवान बिरसामुंडा यांच्या 150 वी जयंती, निम्मित जनजाती गौरव दिन पंधरवडा निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले. पेठ तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा व वसतीगृह यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन रानभाज्या महोत्सव मोठया उत्साहात पार पाडण्यात आला. ग्रामीण भागात ज्या पावसावर अवलंबून असणाऱ्या भाज्या वासत्या, अंबाडी, चुचा, आळू, कुर्डू ,अशा विविध प्रकारच्या रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला तसेचे महोत्सवास नाशिक आदिवासी विकास विभागचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदीप विसे, शिक्षण विस्तार अधिकारी चंदनशिवे तसेच तालुका समन्वयक माजी सरपंच रामदास वाघेरे, मनोहर टोपले, अशोक गवळी,गणेश गवळी आदी तालुक्यातील, सामजिक कार्यकर्ते व नागरिक व मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते