पेठ तालुक्यातील महसूल विभागाचा जनतेच्या दैनंदिन समस्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत उपक्रम.

पेठ तालुक्यातील महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळयाच्या विषयांशी अत्यंत जवळून संबंध असलेला विभाग आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे. ही बाब विचारात घेऊन भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांचा आगामी जन्मदिन दि. १७ सप्टेंबर, २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. ०२ ऑक्टोंबर, २०२५ या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत तीन टप्प्यांमध्ये सेवा पंधरवडा साजरा करणेत येणार आहे.पहिला टप्पा-घटक- पाणंद रस्तेविषयक मोहिम (कालावधी दि.१७ सप्टेंबर,२०२८ ते दि. २२ सप्टेंबर, २०२५ )या कालावधीत राबवावयाच्या बाबी,शिव / पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे,ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक वाजिब उल अर्जामध्येकरण्यात आलेली नाही त्याची नोंदघेण्याबाबत कार्यवाही करणे,शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी संमती पत्र घेणे,रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणेसदर कार्यवाही जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख व उप अधिक्षक भूमी अभिलेख यांच्या समन्वयातूनपाणंद रस्ते मॅपिंगचा कार्यक्रम राबवावयाचा आहे. तसेच पाणंद रस्ते गाव नकाशावर चिन्हांकित करण्याची कार्यवाही करावयाची आहे.दुसरा टप्पा-घटक सर्वासाठी घरे (कालावधी दि.२३ सप्टेंबर,२०२५ ते दि. २७ सप्टेंबर,२५ )“सर्वांसाठी घरे” या योजनेतंर्गत शासकीय जमिनी वाटप केलेल्या / अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या लाभार्थ्यांना जमिनीचे पटूटे वाटप करणे,खाजगी मिळकत धारकाना पटूटे वाटप करणे रहिवासी प्रयोजनासाठी शासकीय जमिनी प्रदान केलेले मिळकत धारक शासकीय जमिनीवरील घरांसाठीची अतिक्रमणे नियमानुकूल केलेले मिळकतदारतिसरा टप्पा-घटक- नावीन्यपूर्ण उपक्रम (कालावधी दि. २८ सप्टेंबर, २०२५ ते दि. ०२ ऑक्टोंबर, २०२५) नाशिक जिल्हयात तिस-या टप्पामध्ये खालीलप्रमाणे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे.१स्मशानभुमी: स्मशानभुमीच्या जागेचे सर्व परिपुर्ण प्रस्ताव तहसिलदार हे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणार आहे. मा.जिल्हाधिकारी आदेश पारित करतील. व तहसिलदार जागेचा ताबा देतील.२.आयुष्मान काई- सर्व अधिकारी / कर्मचारी / कोतवाल हे त्यांच्या कुटुंबासहित / नातेवाईक या सर्वांचे आयुष्मान कार्ड काढण्यात यावे. जिल्हा पुरवठा अधिकरी हे २०२१ नंतरचा रेशनकार्ड DATA ONLINE करण्यासाठी प्रयत्न करतील. सर्व उपविभागीय अधिकारी हे आपल्या अधिनस्त असलेल्या कार्यालयाचा रेशनकार्ड DATA ONLINE करणे बाबतचा आढावा घेतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *