सेवा कर विभागातील (जीएसटी) अधीक्षकासह निरीक्षक २५ हजाराची लाच स्वीकारताना एसीबी कडून अटक.

मुंबई केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रचलेल्या सापळ्यात वस्तू आणि सेवा कर विभागातील (जीएसटी) अधीक्षकासह निरीक्षक अडकले. एका व्यावसायिकाला जीएसटी प्रमाणपत्र देण्यासाठी या दोघांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती.तक्रारदारांचा तयार कपड्यांचा व्यवसाय आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने सांताक्रूझ येथील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी GST ) विभागाच्या (पश्चिम) कार्यालयाकडे जीएसटी नोंदणीसाठी अर्ज केला होता. पाहणीनंतर जीएसटी (GST ) कडून प्रमाणपत्र देण्यात येणार होते. त्यानुसार वस्तू आणि सेवा कर विभागातील निरीक्षकाने पाहणी केली होती. परंतु प्रमाणपत्र देण्यास तो टाळाटाळ करीत होता. सकारात्मक पाहणी अहवाल आणि त्याआधारे नोंदणी प्रमाणपत्र हवे असल्यास २५ हजार रुपये देण्याची मागणी त्याने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *