पाचशे रुपये आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कोल्हापूर मिरज : पाचशे रुपये आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा बनविणाऱ्या कोल्हापुरातील टोळीचा मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीकडून ९९ लाख २९ हजार ३०० मूल्यांच्या बनावट नोटांसह इतर साहित्य असा एक कोटी ११ लाख सहा हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, बनावट नोटा बनविणाऱ्या या टोळीचा मास्टरमाईंड इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत आहे, अशी माहिती सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.श्री. घुगे यांनी कारवाईबाबत दिलेली माहिती अशी : टोळीतील एक संशयित सुप्रीत देसाई बनावट नोटा खपविण्याच्या उद्देशाने मिरजेत आला होता. येथील महात्मा गांधी चौकी पोलिसांच्या पथकाने त्याला जेरबंद करत ४२ हजार रुपये मूल्य असलेल्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्याच्याकडील तपासात कोल्हापूर येथील टोळीची माहिती मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *