भंडारा जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस.
भंडारा जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, महसूल विभागातील सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
बडतर्फ करण्यात आलेले अधिकारी
वसुंधरा वासनिक-इंगळे – मंडळ अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय (पुनर्वसन शाखा)
शारदा सूर्यभान झंझाड – तलाठी (मोहाडी)
विनोद भावे – तलाठी (मोहाडी)
निलंबित करण्यात आलेले अधिकारी
शिवशंकर साखरवाडे – सहाय्यक महसूल अधिकारी
योगराज बाबूराव डांगरे – तलाठी (लाखनी)
दिलीप सिंग ठाकूर – सहाय्यक महसूल अधिकारी (पवनी) दरम्यान, या प्रकरणात आणखी मोठा गैरप्रकार समोर येण्याची शक्यता आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तांनी भंडारा जिल्ह्यातील एकूण 23 कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून, पुढील काळात आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकऱ्या आणि पदोन्नती मिळवल्याचा हा प्रकार उघड झाल्याने प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
