GPB_News

अमरावती सहायक पोलीस उपनिरीक्षक यांची हत्या.

अमरावती:अमरावतीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर असं हत्या करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. कलाम यांच्या टू व्हिलरला आरोपीने आधी फोर व्हिलरने धडक दिली. त्यानंतर त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. घटना घडल्यानंतर हल्लेखोर फाजील खान घटनास्थळावरुन पसार झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस विभागसह अमरावती शहरात एकच खळबळ…

Read More

गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना १० हजार रुपये लाच स्वीकारताना अटक

अहिल्यानगर :- पांचयात समिती राहुरी येथील गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी कडून अटक करण्यात आली, तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत.त्याच्यावर या आगोदर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती. निलंबन सुरू असतानाच तक्रारदार ग्रामसेवक सेवानिवृत्त झाले. त्यांच्यावरील दोषारोपपत्राचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी पाठवायचा होता….

Read More

भडगाव तालुक्यातील रेशनचे धान्य काळ्या बाजारात.

भडगाव:- तालुक्यात अनेक रेशन दुकान आहेत शासनाने रेशन मालाचा काळाबाजार थांबावा म्हणून अनेक उपाययोजना केल्या आहेत. परंतु रेशनचा काळाबाजार थांबत नाही ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांना शासनाची योजना प्रामाणिकपणाने लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आटोकाट प्रयत्न करतांना दिसते. परंतु याच प्रयत्नांना कुठेतरी शासनाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांकडून गालबोट लावण्याचे काम मोठ्या प्रमाणात भडगाव शहरात सुरु आहे. म्हणून सदर काळाबाजार बंद होणार…

Read More

सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांना एसीबी (ACB)कडून अटक

पुणे पिंपरी चिंचवड :- भोसरी येथील सहाय्यक महावितरण एसीबी कडून अटक करण्यात आली.तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार असून, त्यांचे काम महावितरणकडील लायझनिंग आणि वीज कनेक्शनच्या मंजुरीशी संबंधित आहे. त्यांनी ४ मार्च २०२५ रोजी एका ग्राहकासाठी घरगुती वीज जोडणीसाठी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाची प्रक्रिया सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांच्या टेबलावर आली होती. या…

Read More

पाच जणांविरोधात पुसद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुसद स्थानिक गुन्हे शाखेने गोपानीय माहितीच्या आधारे गुरुवार, 5 जून रोजी ही प्रभावी कारवाई केली आहे.या कारवाईत राजकुमार श्रावण पारधी (सावळी ता. मानोरा जि. वाशीम), तुकाराम दामा गुहाडे (हर्षी ता. पुसद), भाऊ आनंद पतंगे (कोंदूर ता. कळमनुरी जि. हिंगोली) आणि रामदास किसन भरकाडे (डोणवाडा ता. वसमत जि. हिंगोली) यांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार…

Read More

कैद्यांच्या नावाखाली जालिंदर सुपेकर व अमिताभ गुप्ता यांच्या कडून ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप

महाराष्ट्रतील कैद्यांच्या नावाखाली पोलीस उपमहानिरीक्षक (मुख्यालय) जालिंदर सुपेकर तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याशिवाय सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकरांवर इतर अनेक प्रकरणात आरोप केले आहे. राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील झंवर नावाच्या कैद्यांच्या मदतीने हा घोटाळा करण्यात आला….

Read More

नागपूरच्या कोंढाळी येथील लाटखोटीया शाळेतील मुख्यधापकाचा मनमानी कारभार

नागपुर मुख्याध्यापकाने पाचवीच्या वर्गाचा निकाल रोखून धरल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. नागपूरच्या कोंढाळी येथील लाटखोटीया शाळेत हा प्रकार घडला आहे.मिळालेल्या माहिती नुसार, मोहम्मद असे पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलाचे नाव आहे. चौथ्या वर्गाची फी न भरल्याने मुख्याध्यापकाने माझ्या मुलाचा शाळा सोडल्याचा दावा दिल्याचे मोहम्मगचे वडील अब्दुल खकिल शेख यांनी म्हटले आहे. आम्ही पाचवीच्या वर्गाची फी सुद्धा…

Read More

नागालँड मधील अजित पवार गटाला खिंडार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार एनडीपीपी मध्ये प्रवेश

नागालँड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदारांनी एनडीपीपीमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पत्रक काढून कारवाईचे संकेत दिले आहेत. सध्या पक्षाकडून पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत कशा प्रकारे या आमदारांवर कारवाई करता येईल याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत स्थानिक…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

नाशिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि ‘चक्र’ चे ( सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था व अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधन, नवाचार व स्टार्ट अप सुरू करणारी केंद्रे व्हावीत. त्यादृष्टीने आरोग्य…

Read More

प्रोफेसर महिलेची १ कोटी ८२ लाख रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांन कडून टोळीचे भांडाफोड

नवी मुंबई एका प्रोफेसर महिलेची सायबर भामट्यांनी आयकर विभागाच्या कारवाईच्या नावाने १ कोटी ८२ लाख ७२ हजारांची फसवणूक केली होती. या महिलेने साडेआठ लाखांचा कर चुकवल्याने त्यांच्यावर विभागाकडून कारवाई होणार असल्याचे त्यांना फोनवरून धमकावले होते. यासाठी त्यांना ईडी, सीबीआय अशा अनेक शासकीय संस्थांचे कारवाईचे बनावट आदेश पाठवले होते. चौकशीसाठी त्यांच्या बँक खात्यातली सर्व रक्कम संबंधितांनी…

Read More