
Category: Business

चंद्रपूर जिल्हा परिषद अभियंत्यांची ओली पार्टी.
जिल्हा परिषदेमध्ये अभियंत्यांची ओली पार्टी रंगली होती. या अभियंत्यांना पार्टी करताना रंगेहाथ पकडले. शासकीय इमारतीमध्ये ही पार्टी रंगली होती. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. आम आदमी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही मोहीम फत्ते केली. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.हे पाच सहा अभियंते जिल्हा परिषदेच्या वसंत भवन या शासकीय विश्रामगृहात…

सरकारने दुटप्पी भूमिका घेऊ नये,समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत.शरद पवार
नाशिक येथील पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात बोलताना महत्त्वपूर्ण विधान केले.राजकीय घडामोडी तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी थेट सरकारला लक्ष्य केले.पवार यांनी, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘हैदराबाद गॅझेट’ लागू करण्याचा जीआर (GR) काढला, त्याला ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. या जीआरला…

पेठ तालुक्यातील महसूल विभागाचा जनतेच्या दैनंदिन समस्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत उपक्रम.
पेठ तालुक्यातील महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळयाच्या विषयांशी अत्यंत जवळून संबंध असलेला विभाग आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे. ही बाब विचारात घेऊन भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांचा आगामी जन्मदिन दि. १७ सप्टेंबर, २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि….

नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाती तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मध्यरात्री अटक.
मालेगाव येथील बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. तरी नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकासह प्रमुख अधिकाऱ्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली. मंगळवारी (दि.९) मध्यरात्री जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि एका कार्यालयीन…

पेठ तालुक्यात भगवान बिरसामुंडा १५० वी जयंती साजरी.तसेच रानभाजी महोत्सव साजरा.
पेठ तालुक्यातील इनामबारी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे भगवान बिरसामुंडा यांच्या 150 वी जयंती, निम्मित जनजाती गौरव दिन पंधरवडा निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले. पेठ तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा व वसतीगृह यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन रानभाज्या महोत्सव मोठया उत्साहात पार पाडण्यात आला. ग्रामीण भागात ज्या पावसावर अवलंबून असणाऱ्या भाज्या वासत्या, अंबाडी, चुचा, आळू,…

पेठ तालुक्यातील उस्थळे येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
पेठ तालुक्यातील उस्थळे शिवारात गेल्या महिन्या भरा पासून बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने पेठ प्रादेशिक वनविभाग मार्फत जनजागृती कार्यकम सतत राबविण्यात येत असल्याने. उस्थळें शिवारात पिजरा लावण्यात आल्याने.आज रात्री 3 वाजेच्या सुमारास बिबट पिजऱ्यात जेरबंद झाल्याचे दिसून आले. त्याचे वय साधारण अंदाजे 3 वर्ष असावे.असे सांगण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश साळवे,…

मोबाईलवर गेम आणि चॅटिंग करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने शिस्तभंगाची कारवाई होणार.
विधान सभेत धिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांना खाते गमावण्याची वेळ आली. आता कार्यालयात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या आणि चॅटिंग करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर राज्य प्रशासनाने शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उचलला आहे.त्यामुळे मंत्रालयापासून विविध सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयीन उपस्थिती, वक्तशीरपणा व शिस्तपालनाविषयी सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभागाकडून अनेकदा वेळोवेळी…

तहसीलदार कार्यालय, पेठ येथे आढावा बैठक संपन्न.
नाशिक पेठ -: तहसीलदार कार्यालय, पेठ येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी नरहरी झिरवाळ मंत्री, अन्न व औषध प्रशासन,विशेष सहाय्य,महाराष्ट्र राज्य. | आमदार पेठ-दिंडोरी. Minister FDA, … बैठकीत, उपस्थित होते.त्यांनी विवीध योजनां अंतर्गत मिळणारे मानधन वितरित न झाल्यामुळे दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीचा आढावा घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ व तालुक्यांतील रस्त्याची…

पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश.
जालना जिल्हा आंदोलकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कंबरेत ‘फिल्मी स्टाईल’ लाथ घालणे पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांना भोवण्याची शक्यता आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि जालना जिल्हा पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे.शिवाय कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

धुळे पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे एसीबी कडून अटक
धुळे तालुक्यातील चांदे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या त्यांना कमी आढळून आली होती. याबाबत वरिष्ठांना शाळेचा प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात तसेच शाळेला समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी स्वतः करिता आणि शिक्षण…